Ad will apear here
Next
‘लोकबिरादरी’साठी ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स’
पुणे : हेमलकसा (गडचिरोली) येथील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील जखमी वन्यप्राण्यांच्या अनाथालयाच्या मदतीसाठी येथील लोकबिरादरी मित्रमंडळातर्फे ‘फन फेअर विथ पॉज अँड टेल्स- सीझन ३’ या विशेष कार्यक्रमाचे सलग तिसर्‍या वर्षी आयोजन करण्यात आले आहे.

‘गेल्या ४४ वर्षांपासून डॉ. आमटे अनाथ, जखमी प्राण्यांसाठी करत असलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन पाळीव प्राण्यांची गंमतजत्रा आयोजिली आहे. त्यासह या कार्यक्रमातून उभा राहणारा निधी हेमलकसा प्रकल्पातील प्राण्यांच्या खाद्यासाठी, औषधांसाठी दिला जाणार आहे,’ अशी माहिती लोकबिरादरी मित्र मंडळच्या समन्वयिका शिल्पा तांबे व योगेश कुलकर्णी यांनी दिली.

११ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन’ सप्ताहातील ‘प्रॉमिस डे’ आहे. त्यामुळे त्याच संकल्पनेवर आपल्या प्राण्यांविषयी दयाभाव दाखविण्याचे ‘प्रॉमिस’ करणे अशी यंदाची संकल्पना आहे. या जत्रेत हेमलकसा येथील वन्यप्राण्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, पाळीव कुत्र्यांसाठी फन फेअर (गंमतजत्रा), फॅन्सी ड्रेस स्पर्धा व रॅम्प वॉक होणार असून, त्यांच्या खाद्याचे स्टॉल्स, फोटो बूथ, विविध गेम्स, इतर पाळीव प्राण्यांची छायाचित्र स्पर्धा या गोष्टींचा सामवेश केला गेला आहे; तसेच काही प्राणीतज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र, प्रात्यक्षिके, समुपदेशन आणि पायाभूत प्रशिक्षण सल्ला याचेही  आयोजन केले आहे. उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या पाळीव कुत्र्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

लोकबिरादरी मित्र मंडळ युवकांमध्ये सामाजिक भावना जोपासण्याचे काम करीत असून, पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन केले आहे. कार्यक्रमाच्या आखणीपासून प्राण्यांच्या पालकांना भेटणे, विविध परवानग्या आणि इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात या युवा स्वयंसेवकांचा सहभाग कौतुकास्पद आहे. त्यामध्ये राजेश्वरी, मनिष, पार्थ, शुभम, काजल, अनिकेत, भावना, सलोनी, उर्वी, तन्वी आदींचा मोलाचा वाटा आहे.

कार्यक्रमस्थळी डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पासाठीचे मदतीचे धनादेश ‘महारोगी सेवा समिती वरोरा’ या नावाने स्वीकारले जातील.

कार्यक्रमाविषयी :
दिवस : रविवार, ११ फेब्रुवारी २०१८
वेळ : दुपारी चार ते रात्री आठ.
स्थळ : भारतीय विद्याभवनचे परांजपे विद्यामंदिर, कोथरुड, पुणे.
संपर्क : योगेश (९८२२२ ७३५४५), शिल्पा (९२२६९ ५८८८८)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZWVBL
Similar Posts
हेमलकसामध्ये एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण गडचिरोली : डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पामध्ये नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतिगृह अधीक्षिका नेहा ठोंबरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. या वेळी आमटे कुटुंबीय, लोकबिरादरी आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते
माडिया भाषेतील पहिल्या पुस्तकाची निर्मिती पुणे : महाराष्ट्रातील गडचिरोली आणि छत्तीसगडमधील बस्तर भागातील आदिवासींच्या ‘माडिया’ भाषेतील लिखित स्वरूपातील पहिले पुस्तक पुणे विद्यापीठातील जर्मन भाषेच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. मंजिरी परांजपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केले आहे.
श्वानांनीही केले ‘रॅम्पवॉक’ पुणे : चालू दुचाकीवर तोल सांभाळणारी साशा अन स्कॉच... रॅम्पवर रुबाबात चालणारे रोमियो व ज्युलिएट... मेरी ख्रिसमस झालेला ब्रुनो... अशी वेगवेगळ्या जातीच्या श्वानांची सौंदर्यस्पर्धा पाहताना पुणेकर रंगून गेले होते. निमित्त होते, लोकबिरादरी मित्र मंडळ, पुणेतर्फे आयोजित पाळीव कुत्र्यांच्या गंमत जत्रेचे, अर्थात
अटल टिंकरिंग लॅब चालवणाऱ्या शाळांचा मेळावा पुणे : ‘शालेय मुलांची विज्ञानाबद्दलची समज लक्षात घेता, त्यांना विज्ञानाच्या माध्यमातून एकदम मोठ्या समस्यांवर उत्तरे शोधता येतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. स्वतःशी निगडित असलेल्या छोट्या समस्या समजून घेणे आणि विज्ञानाची कोणती तत्त्वे ती समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतील याचा विचार करत धडपड करणे, हेच विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language